मुंबई - सुशांत सिंह प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात सीबीआय आणि अंमली पदार्थ विरोधी पथक चौकशी करत असताना रोज नवीन माहिती समोर येत आहे. यामध्ये ड्रग लिंक्स देखील समोर आल्या आहेत. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने सिनेसृष्टीतील काही लोकांची चाचणी करण्याची मागणी केली होती. यामध्ये आता माजी खासदार निलेश राणे यांनी फक्त रणवीर आणि रणबीर यांची चाचणी कशाला, 'आदित्य ठाकरेंची देखील चाचणी करावी,' असे म्हटले आहे.
'आदित्य ठाकरे यांची देखील ड्रग्ज टेस्ट करा' - आदित्य ठाकरे
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग लिंक्स समोर आल्या आहेत. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने सिनेसृष्टीतील काही लोकांची चाचणी करण्याची मागणी केली होती. यामध्ये आता माजी खासदार निलेश राणे यांनी फक्त रणवीर आणि रणबीर यांची चाचणी कशाला, 'आदित्य ठाकरेंची देखील चाचणी करावी,' असे म्हटले आहे.
'आदित्य ठाकरे यांची देखील ड्रग्स टेस्ट करा'
यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असं तिने म्हटलं होतं. यातच आता माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतलीय. मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॉलिवूडमध्ये चांगले नातेसंबंध आहेत. त्यामुळे फक्त अभिनेत्यांचीच चाचणी न करता आदित्य ठाकरेंची देखील करावी असे टि्वट त्यांनी केले आहे.
Last Updated : Sep 3, 2020, 11:47 AM IST