मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक पथक गौरव आर्या या ड्रग्ज डीलरची चौकशी करण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते. यानंतर गौरव आर्या हा गोव्यातून बेपत्ता असल्याचे समोर आले. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. या नंतरच्या तपास कामात ईडीकडून गौरव आर्या यास समन्स बजावण्यात आले आहे. 31 ऑगस्ट रोजी गौरव आर्याला मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागणार असल्याचे यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : 'ड्रग डिलर' गौरव आर्याला 'ईडी'कडून समन्स जारी
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक पथक गौरव आर्या या ड्रग्ज डीलरची चौकशी करण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते. यानंतर गौरव आर्या हा गोव्यातून बेपत्ता असल्याचे समोर आले. त्याचा शोध अद्याप सुरू आहे. या नंतरच्या तपास कामात ईडीकडून गौरव आर्या यास समन्स बजावण्यात आले आहे. 31 ऑगस्ट रोजी गौरव आर्याला मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागणार असल्याचे यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आर्थिक व्यवहारासंबंधी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचलनालयासमोर आज रिया चक्रवर्ती हजर झाली.तसेच सीबीआयने देखील रियाची चौकशी केली. यावेळी रिया चक्रवर्ती आणि गौरव आर्या यांच्यादरम्यान झालेले व्हॉट्सअॅप संभाषण मिळाल्यानंतर तपासाला आणखी नवे वळण लागले. संबंधित माहिती सीबीआय व 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ला दिल्यानंतर आता तपास सुरू आहे.
दरम्यान, सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू असून मुंबईतील सांताक्रुझ येथील डीआरडीओ कार्यालयामध्ये सीबीआयचे पथक चौकशी करत आहे. आज सकाळी 11 वाजता सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी सीबीआयने समन्स बाजावल्यानंतर ती अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाली. या बरोबरच शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी व नीरज यांचीही चौकशी सीबीआयचे पथक करत आहे.