महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Many Fish Dead in Banganga pond : बाणगंगा तलावात 22 क्विंटल माशांचा मृत्यू

मुंबईतील मलबार हिल येथे असलेल्या बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू ( Many Fish Dead in Banganga pond in Malabar Hill ) झाल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे सातत्याने माशांचा मृत्यू होत आहे.

बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू

By

Published : Apr 22, 2022, 1:49 PM IST

Updated : Apr 22, 2022, 5:16 PM IST

मुंबई -मुंबईतील मलबार हिल येथे असलेल्या बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू ( Many Fish Dead in Banganga pond in Malabar Hill ) झाल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे सातत्याने माशांचा मृत्यू होत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास इथे काही मासे मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती महानगरपालिकेला कळवण्यात आली होती. त्यानंतर ही गुरुवारच्या सकाळी आणि शुक्रवारच्या सकाळी अशाच प्रकारे मृतावस्थेत शेकडो मासे मिळाले आहे.

22 क्विंटल मृत माशांना तलावातून बाहेर काढले - मृत माशांना तलावातून बाहेर काढण्याचे काम महानगरपालिकेकडून गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 20 ते 22 क्विंटल मृत माशांना तलावातून बाहेर काढण्यात आले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येतेय. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर मृत माशांचे काही नमुने तसेच जीवंत मासाचे काही नमुने आणि तलावातील पाण्याचे नमुने तपासासाठी अधिकाऱ्यांनी जमा केले आहेत.

असलम शेख करणार पाहणी - काही वर्षा आधी पितृपक्ष समाप्तीच्या वेळेस या तलावात मोठ्या प्रमाणात पिंडदान करण्यात आला होते. त्यावेळेसही तलावातले मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना घडली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र या वेळेस मासे मरण्याचे प्रमाण हे त्या वेळ पेक्षा अधिक आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री आणि बंदरे विकास मंत्री असलम शेख आज संध्याकाळी या तलावाची पाहणी करणार असून घटना घडल्याच्या करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

हेही वाचा -Hanuman Chalisa Recite At Matoshree LIVE Update : राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; नंदगिरी अतिथीगृहाबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

Last Updated : Apr 22, 2022, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details