मुंबई- ड्रायव्हरचे काम करत असणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या लग्नासाठी पैशाची चणचण असल्यामुळे मालकाच्या जुळ्या मुलांना अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुहू परिसरांमध्ये राहणाऱ्या मालकाच्या मुलांना नेहमीप्रमाणे ड्रायव्हरने अंधेरी परिसरामध्ये टेनिस खेळण्यासाठी घेऊन गेला होता. मुलींच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे त्याने आपल्या मेव्हण्याच्या साथीने हा अपहरण करण्याचा डाव रचला होता. त्यानंतर मालकाकडे त्याने 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
पैशांसाठी ड्रायव्हरने मालकाच्या मुलांचे केले अपहरण; पोलिसांनी उधळला डाव
ड्रायव्हरचे काम करत असणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या लग्नासाठी पैशाची चणचण असल्यामुळे मालकाच्या जुळ्या मुलांना अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटात लावला छडा
दोन दिवसापूर्वी ड्रायव्हरने आपल्या मेव्हण्याला उत्तरप्रदेशमधून मुंबईला बोलवण्यात आले होते. त्याला कशाप्रकारे मुलाचे अपहरण करायचे हा सर्व प्लान सांगण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हा सर्व प्लान तयार करून दोन्ही मुलांचे अपहरण केले होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा डाव पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटांमध्ये उलथवला. दोन्ही मुलांची सुखरुप सुटका केली आहे. याप्रकरणी ड्रायव्हर आणि त्याच्या मेव्हण्याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असताना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . याविषयी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे