महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; जीन्स-टीशर्ट बंद! सरकारकडून अध्यादेश जारी - शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड

सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत, याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

By

Published : Mar 17, 2021, 11:56 AM IST

मुंबई -शासकीय कार्यालयात वावरताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिस्तीतच यायला हवे. या शिस्तीचा दैनंदिन कामावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत, याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्लीपर पेहराव करण्यास मनाई केली आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहे.

मंत्रालय तसेच सर्व शासकीय कार्यालयातून राज्य सरकारचा गाडा हाकला जातो. ही कार्यालये जनमानसासाठी एक प्रतिनिधीच असतात. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, उच्च पदस्थ अधिकारी यांची कार्यालयात ये-जा सुरू असते. अशा वेळी सरकारी अधिकारी व कर्मचारी व्यक्ती यांची वेशभूषा महत्त्वाची ठरते. त्यांच्या वेशभूषेवरूनच येथे कार्यरत असलेल्या आस्थापनांची एक विशिष्ट छाप अभ्यंगतावर पडते. त्यामुळे कार्यालयाला अनुरूप पेहराव असावा, यासाठी राज्य सरकारने ड्रेसकोड निश्चित करणारे परिपत्रक नुकतेच जाहीर केले.

असा असेल ड्रेस कोड -

  • महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.
  • पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान कर नयेत.
  • सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये. केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.
  • खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

स्लीपरचा वापर नको -

महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करु नये.

हेही वाचा -ममतांनी दुखापतीचे राजकारण करू नये; नितीन गडकरींचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details