मुंबई - कोविड लस कधी येणार याबाबत अनेकांना प्रश्न असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून ही लस तयार करण्यात आली आहे. भारती हॉस्पिटलमध्ये 5 लोकांना लस देण्यात आली आहे. यानंतर स्वयंसेवकांची RTPCR टेस्ट देखील करण्यात येणार आहे. पुढचे 6 महिने त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. यानंतर देशभरात ICMR आणि सिरमकडून लस दिली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया मंत्री कदम पुढे म्हणाले, 18 वर्षाच्या स्त्रीपासून वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना ही लस देण्यात आली आहे. वयोवृद्धाला अद्याप लस देण्यात आलेली नाही. सिरम इन्स्टिट्यूटकडून देशभरातील 17 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -'मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला संसार शोधण्याला सुरूवात'
काँग्रेस अंतर्गत राजकारण बद्दल प्रश्न विचारले असता विश्वजीत कदम म्हणाले, 'काँग्रेस ही भक्कम विचारांची मूल्ये असलेला पक्ष आहे. सोनिया गांधी यांनी चांगले नेतृत्व केले. या पक्षाला 125 वर्षांचा इतिहास आहे. अनेक निवडणुका सोनियाजींच्या नेतृत्वात जिंकलो. सोनियाजी आणि राहुलजी यांच्या पाठीशी उभे राहू' असे कदम यांनी स्पष्ट केले.
अभिनेता सुशांतसिंह यांच्या आत्महत्या वरून राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना विश्वजीत कदम म्हणाले, 'मला नाही माहीत कोणाचं नाव आहे. सध्याच्या परिस्थितीत यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.'
हेही वाचा -कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी पुण्यात पडली पार