मुंबई: डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचा (Homi Bhabha state University) पहिला दीक्षान्त समारंभ ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. (Homi Bhabha University convocation) या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे असणार आहेत. समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची प्रमुख उपस्थिती असेल. समारंभात भूतपूर्व लोकायुक्त व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म. ल. टहलियानी हे दीक्षान्त भाषण देणार आहेत.
इतिहास: महाराष्ट्र सरकारने डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबईसह क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून स्थापन केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई ही विद्यापीठाची आघाडीची संस्था आहे. यातील सर्व महाविद्यालये 99 वर्षांहून अधिक जुनी आहेत; सर्वात तरुण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना 1920 मध्ये झाली; सर्वात जुने एल्फिन्स्टन कॉलेज १८३५ मध्ये स्थापन झाले.