मुंबई: रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Technical University) 34 प्राध्यापक पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना सरळ मुलाखतीसाठी जाता येईल. आपले आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊनच मुलाखतीसाठी जावे, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.
या पदांसाठी आहेत जागा: विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राच्या अभियंता पदासाठी सहा जागा, पेट्रोकेमिकल अभियंता 03 जागा, यांत्रिक अभियंता 02 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंग ०२ जागा, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजीनियरिंगच्या 09 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 08 जागा, कम्प्युटर इंजिनियरच्या 02 जागा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअर साठी एक जागा, गणित आणि इंग्रजी भाषेसाठीचे प्रत्येकी एक जागा अशा विविध पदांसाठी नोकरीची संधी आहे. उमेदवारांना सरळ मुलाखती साठी आमंत्रित केलेले आहे.
विविध पदांसाठी मुलाखत वेळापत्रक असे असणार:केमिकल इंजिनियर, पेट्रोल केमिकल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर यांच्यातील पदांसाठी 10 ऑक्टोंबर 2022 रोजी सरळ मुलाखत आहे. तर सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर यांच्यासाठी 11 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखत आहे. कम्प्युटर इंजिनियर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियर, गणित आणि इंग्रजी या संदर्भातल्या जागांच्या भरतीसाठी 12 ऑक्टोंबर 2022 रोजी थेट मुलाखत होणार आहे.