चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे; इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन : मान्यवरांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवरील सोहळा संपन्न.. - महापरिनिर्वाण दिन लाईव्ह
11:11 December 06
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे; इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील - जयंत पाटील
11:11 December 06
एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम पूर्ण करू - धनंजय मुंडे
इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत मुंडे बोलत होते.
10:22 December 06
राज्यपाल कोश्यारींनी वाहिली श्रद्धांजली, पाहा संपूर्ण भाषण..
10:19 December 06
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; पाहा संपूर्ण भाषण..
10:17 December 06
घरुनच अभिवादन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अनुयायांचे मानले आभार..
बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतानाच, चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंदन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी न करता घरातूनच अभिवादन केल्याबद्दल त्यांनी अनुयायांचे आभार मानले. बाबासाहेब यांना अपेक्षित असलेले अनुयायी तुम्ही खऱ्या अर्थाने आहात हे देखील दाखवून दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
09:05 December 06
चैत्यभूमीवरील कार्यक्रम संपन्न; शरद पवारही होते उपस्थित..
चैत्यभूमीवरील बाबासाहेबांना शासकीय सलामी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. याठिकाणी नऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित झाले होते.
08:54 December 06
गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रद्धांजली..
गेली कित्येक वर्षे वंचित राहिलेल्या समाजाच्या कल्याणासाठी भाजपा सरकार हे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे. एक सर्वसमावेशक संविधान तयार करत देशात प्रगती, समृद्धी आणि समानता प्रस्थापित करण्याचा प्रशस्त मार्ग मोकळा करणाऱ्या महामानवास अभिवादन, अशा आशयाचे ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
08:47 December 06
पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्व बांधील आहोत. त्यांचे विचार हे लाखो लोकांना प्रेरणा देतात, अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली.
07:56 December 06
यंदाचा कार्यक्रम वेगळा..
दरवर्षी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोविड-१९च्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे मुख्यमंत्री, पालिका प्रशासनाने केले होते. त्यानुसार लाखोंचा जनसमुदाय दादर येथे येतो तो आलेला नाही. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे.
07:56 December 06
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही चैत्यभूमीवर पोहोचले आहेत.
07:42 December 06
अभिवादनासाठी मान्यवर उपस्थित..
उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, आयुक्त इगबाल सिंग चहल, जिल्हाधिकारी अजित निवळकर आणि महापौर किशोरी पेडणेकर हे अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत.
07:38 December 06
सकाळी आठ वाजता देण्यात येणार शासकीय सलामी..
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी शासकीय सलामी दिली जाते. आज सकाळी ८ वाजता शासकीय सलामी दिली जाणार आहे. त्यासाठी दादर चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दूरदर्शन व सरकारी यंत्रणांकडून लाइव्ह दाखवला जाणार असल्याने या कार्यक्रमाला मीडियाला प्रवेश दिला जाणार नाही.
06:31 December 06
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन..
मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यादिवशी चैत्यभूमीवर अनुयायींची गर्दी उसळलेली असते. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनुयायींना चैत्यभूमीवर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.