मुंबई - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे. दादर येथील चैत्यभूमी येथे पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी देखिल चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच लोकसभा निवडणुकीचे विविध उमेदवारही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येणार आहेत.
जय भीमचा घोष; चैत्यभूमी परिसरात अनुयायांचे महामानवाला अभिवादन - anniversary
मुंबईतील आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार हे लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जात आहे.
डॉ. आंबेडकर यांची जयंती मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी साजरी करण्यास सुरुवात झाली. सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत. ही गर्दी संध्याकाळपर्यंत वाढत जाईल. जयंतीनिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील आंबेडकरी वस्त्या, बौद्ध विहार हे लाईटिंग, निळे झेंडे यांनी सजल्या आहेत. लाऊड स्पीकरवर आंबेडकरी गीते वाजवली जात आहेत. घराघरात खीर आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला जात आहे. संध्याकाळी आंबेडकर जयंती मिरवणुका काढण्यात येणार आहेत.