महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

15 मे पासून दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात, पुढे 20 दिवस जरा जास्त जपा - डॉ. अविनाश सुपे - mumbai corona Update

15 मे पासून दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात होईल. पुढचे 20 दिवस जरा जास्त जपा असे डॉ. अविनाश सुपे म्हणाले.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 24, 2021, 8:29 PM IST

मुंबई - गेल्या एक-दीड महिन्यात कोरोना रुग्णसंख्या नवनवीन उच्चाक गाठत आहे. दुसरीकडे मृत्यूदरही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे संकट कधी संपेल वा दुसरी लाट कधी ओसरेल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तेव्हा राज्य कोविड टास्क फोर्सने एक दिलासादायक बातमी दिली आहे. ती म्हणजे मागील दीड महिन्यांपासून हाहाकार उडवणारी ही दुसरी लाट 15 मे पासून ओसरण्यास सुरुवात होईल. जूनमध्ये बऱ्यापैकी दिलासादायक चित्र असेल असा डॉ. अविनाश सुपे, सदस्य, राज्य कोविड टास्क फोर्स यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. पुढेचे 15 ते 20 दिवस धोक्याचे असून या काळात नागरिकांनी विशेष काळजी घेत, लॉकडाऊन तसेच कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

रुग्ण वाढले की मृत्यूही वाढणार! -

सद्या दुसऱ्या लाटेत मृत्यू खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. मुंबईत दिवसला 50 ते 80 दरम्यान मृत्यू होत आहे. राज्यातील मृत्यूचा आकडा 300 वरून आता थेट 750 च्या पुढे जाऊ लागला आहे. ही चिंताजनक बाब मानली जात आहे. डॉ सुपे यांनी मात्र मुळात रुग्ण संख्याच प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मृत्यू ही वाढते आहेत, असे स्पष्ट केले आहे. रुग्ण उशीरा, गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होत आहेत, तर कुणी बेड न मिळाल्याने, कुणी ऑक्सिजन-व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमावत आहे. त्यामुळेही मृत्यूदर वाढत आहे, असेही ते सांगतात. त्याचवेळी मुंबईत रुग्ण संख्या काहीशी घट चालली असून मृत्यू दरही लवकरच कमी होईल असाही विश्वास व्यक्त केला आहे.

तरुणांना जास्त लागण, पण जास्त मृत्यू वृद्धांचेच -

दुसरी लाट आणि नवा डबल आणि ट्रिपल म्युटंट हे पहिल्या कोरोना विषाणूच्या कित्येक पट घातक आहे. हा चोपट वेगाने पसरत असून थेट फुफ्फुसावर हल्ला करत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. त्याचवेळी पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बाधित होत होते. दुसऱ्या लाटेत नवा म्युटंट तरुणाना आपली शिकार करत आहेत. राज्यात आज 21 ते 40 वयोगटातील रुग्णांची संख्या वाढती आहे. मात्र, असे असले तरी जास्त मृत्यू मात्र 50 ते 80 दरम्यानच्या रुग्णांचे होत असल्याचेही डॉ सुपे सांगतात. महत्वाचे म्हणजे 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले वा 15 दिवसांपासून उपचार घेत असलेले रुग्ण आता मृत्युमुखी पडत असल्याचे ही ते सांगतात. परिणाम ही नव्या म्युटंटचाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा म्युटंट वेगाने फुफ्फुस आणि इतर अवयव निकामी करत आहे. तेव्हा जराही ताप आला वा कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित कोरोना चाचणी करा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

कोणतीही लाट दोन ते अडीच महिने असते! -

दुसरी लाट कधी ओसरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशावेळी डॉ. सुपे यांनी 15 मे पासून ही लाट ओसरण्यास सुरवात होईल असे सांगितले आहे. कोणतीही लाट ही दोन ते अडीच महिने असते. त्यानंतर ती ओसरते. त्यानुसार मार्चमध्ये दुसरी लाट सुरू झाली असून आता 15 मे नंतर लाट ओसरण्यास सुरुवात होईल. जूनमध्ये परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, असाही त्यांचा दावा आहे. फक्त आता नागरिकांनी 15 मे पर्यंत घरात राहणे गरजेचे आहे. त्यानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे कडक पालन करणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details