मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग आहे. 2014 ला देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू करण्यात आला. आता दुसऱ्यांदा राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचे सरकार आल्यानंतर या महामार्गाला गती देण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. 15 ऑगस्टला या मार्गाचा 210 किलोमीटरचा पहिला टप्पा नागपूर ते वाशीम जिल्ह्यातील सेलु बाजार असाच सुरू करण्याचा मानस विद्यमान सरकार आणि एमएसआरडीसी विभागाचा होता. मात्र अद्यापही या पहिल्या टप्प्यातील काही कामे अपूर्ण आहेत. या महामार्गाच्या शेवटच्या टप्यातील काम शिल्लक असल्याने 15 ऑगस्ट चा मुहूर्त चालता येणार नाही असं काही अधिकारी म्हणत आहेत. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. राज्य सरकार कडून 15 ऑगस्ट मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटला जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार? - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या पहिल्ला टप्पा 15 ऑगस्टला लोकार्पण करण्याचे जाहीर केले होते. परंतू महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे लोकार्पणाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
![समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार? doubts about the opening of first phase of samriddhi highway on august 15 due to insufficient work](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16072737-631-16072737-1660188183561.jpg)
पहिला टप्पा सुरु होण्यासाठी प्रयत्न - मे महिन्यामध्ये हा पहिला टप्पा आधी सुरु करण्यात येणार होता. मात्र नागपूर जवळ असत प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेला बायपासचा बोगदा कोसळल्याने त्यावेळी मे महिन्यातला मुहूर्त साधता आला नव्हता. त्यावेळी नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 15 ऑगस्टला पहिल्या टप्प्याचा मुहूर्ताची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही अद्याप काही काम शिल्लक असल्याने हा मुहूर्त साधता येईल का ? असा प्रश्न राज्यसरकार आणि एमएसआरडीसी विभागासमोर उभा राहिला आहे. मात्र या सुमुहूर्तावर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितल आहे.