मुंबई:मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार (Monsoon disease) डोकं वर काढतात. यंदाही पावसाळी आजारांना सुरुवात झाली आहे. मागील आठवडाभरात मलेरिया, (malaria) डेंग्यू, (dengue) लेप्टो, (gastro ) गॅस्ट्रो, कावीळ (jaundice) या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ (double increase in the number of patients) झाली आहे. १८ ते २५ सप्टेंबर या आठवडाभरात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१, लेप्टोचे ९ तर गॅस्ट्रोच्या ८८ रुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्णसंख्येत वाढ-(increase in patients)मुंबईमध्ये १ ते २५ सप्टेंबरपर्यंत २५ दिवसांत मलेरियाचे ५७० रुग्ण, लेप्टोचे ३६, डेंग्यूचे १८०, गॅस्ट्रोचे २९६, हेपेटायसिसचे ५६, चिकनगुनियाचे २ तर स्वाईन फ्लूच्या ७ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर स्वाईन फ्लूच्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाच्या ७ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.