मुंबई - मुंबै जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी अनियमितपणे आमदार सुरेश धस यांना कर्ज दिल्या प्रकरणी सहकार विभागाने प्रवीण दरेकर (Praveen Darekar) व आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhus) या दोघांनाही नोटीस पाठवली आहे, याबाबत खुलासा करताना प्रवीण दरेकर व सुरेश धस यांनी कुठल्याही गैरप्रकार कर्ज घेतले नसल्याचे व त्यांनी दिले नसल्याचे सांगितले आहे. (Home Minister Dilip Walse Patil) नियमाच्या अधीन राहूनच त्यांना कर्ज दिले आहे असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. विधान भवनात ते बोलत होते.
हे सर्व षडयंत्र
याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की जाणून बुजून हे सर्व षड्यंत्र सुरू आहे. आमदार सुरेश धस यांना दिलेले कर्ज योग्य आहे. त्यात कुठलीही गडबड नाही आहे. (Praveen Darekar On Dilip Walse Patil ) नवाब मलिक आत गेले, अनिल देशमुख आत गेले. आता भाजपचं कोणी सापडत आहे का? याचा ते शोध घेत आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेताना आम्हीं कागदोपत्री व्यवस्थित पूर्तता केली आहे. ते कर्जाचा हफ्ता देखील व्यवस्थित भरत आहेत. (Mumbai Bank Praveen Darekar ) हे सरकार आमच्या प्रेमाने इतके आंधळे झाले आहेत त्यामूळे रोज १० ते १५ नोटीसा आमला येतं आहेत. ग्रह मंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा मुंबई बँकेने कर्ज दिलं होतं त्याचीही आता चौकशी करा असेही प्रवीण दरेकर म्हणाले.