मुंबई - मुंबई महापालिकेतील मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक या पदांच्या कालबद्ध पदोन्नतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करावी. तसेच, त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी यासह आदी मागण्यांसाठी आज शुक्रवारी (८ ऑक्टोबर) शेकडो लिपिकांनी आझाद मैदानात आंदोलन केले आहे. दि म्युनिसीपल युनियन आणि हिंदुस्थान कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. १८ ऑक्टोबरपर्यंत मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही, तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
बेमुदत संपाचा इशारा -
पदोन्नतीच्या पदासाठी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट रद्द करून विशेष प्रशिक्षण देऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतर कालबद्द पदोन्नती विनाअट पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी, प्रत्येक विभागातील आस्थापना विभागासाठी सॅप कन्सल्टंटची नेमणूक करावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. शुक्रवारी शेकडो लिपीकीय कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात लॉंगमार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. दि. म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस रमाकांत बने, हिंदुस्तान कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिवाकर दळवी आदींनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संघटनांचे शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी लिपिकीय संवर्गाच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन सादर करण्यात आल्याचे रमाकांत बने यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्यात अंतोष आहे. त्यामुळे येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत मागण्यांबाबत तोगडा न काढल्यास लिपिकीय संवर्गातील कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशाराही संघटनांनी दिला आहे, अशी माहिती कामगार नेते शशांक राव यांनी दिली.
कर्मचारी संघटनांसोबत चर्चा