महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदी मेहुलभाई.. मेहुलभाई.. बोलत होते...तो देशातून पळाला कसा? -नवाब मलिक यांचा सवाल - Nirav Modi

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्रसरकारकडून केला जातोय, याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 'मेहुल चौक्सी परत आणलं जातंय, ठीक आहे! पण मेहुलभाई देशातून पळाला कसा?' असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक

By

Published : Jun 3, 2021, 2:15 PM IST

Updated : Jun 3, 2021, 3:31 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई... मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? अशी खोचक सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच जेवढी तत्परता मेहुल चोक्सीला आणण्यासाठी दाखवताय, तेवढीच तत्परता मेहुल चोक्सी पळून जाताना का दाखवण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्रसरकारकडून केला जातोय, याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मंत्री नवाब मलिकांचा मोदींना सवाल

'नीरव मोदी, विजय मल्ल्या, यांना कधी आणणार?'

'मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे. परंतु नीरव मोदी, विजय मल्ल्या, यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे', असेही नवाब मलिक म्हणाले. 'मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही, तर तो पळाला कसा? हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना मोदींनी तत्परता का दाखवली नाही?' असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा -विजय मल्ल्याची 5600 कोटीची मालमत्ता होणार जप्त; कारवाईला न्यायालयाकडून हिरवा कंदील

Last Updated : Jun 3, 2021, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details