महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रालय आणि शासकीय कार्यालयात गर्दी करू नका; राजेश टोपेंचे आवाहन - आरोग्य मंत्री राजेश टोपे ऑन कोरोना

सर्व पक्षीय सहकाऱ्यांना आवाहन आहे की, मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात गर्दी करू नये, अतिमहत्वाचे काम असेल तरच मंत्रालयात या, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Rajesh Tope
आरोग्य मंत्री राजेश टोपे

By

Published : Mar 18, 2021, 5:37 PM IST

Updated : Mar 18, 2021, 6:24 PM IST

मुंबई - माझ्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांना आवाहन आहे की, मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात गर्दी करू नये, अतिमहत्वाचे काम असेल तरच मंत्रालयात या, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारनेही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करणे आमचे काम असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा -'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका

पासिंग ट्रेंस करणं राज्य सरकार पुढे आव्हान

कालच्या बैठकीत कोणताही वाद झाला नसून, मी मुख्यमंत्री यांच्या शेजारीच बसलो होतो, असे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले आहे. कोविडसंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. अमित शाह यांनीही वाढत्या कोरोना केससंदर्भात सूचना केल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही त्या सूचनांचे पालन करत आहोत. तसेच पासिंग ट्रेंस करणं हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. तसेच कुठेही खाटा कमी नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा -सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली

Last Updated : Mar 18, 2021, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details