महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati violence अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा; गृहमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

home minister
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By

Published : Nov 12, 2021, 10:16 PM IST

Updated : Nov 13, 2021, 12:46 PM IST

मुंबई - त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
  • जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन -

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी केले आहे.

  • दोषींवर कठोर कारवाई -

यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी (Home Minister Dilip Walse Patil) दिल्या आहेत.

हेही वाचा -कंगना रणौतचा पद्मश्री तात्काळ परत घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करा, नवाब मलिकांचा हल्लाबोल

Last Updated : Nov 13, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details