मुंबई -वरळी येथे लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील हनुमान गल्ली येथे शनिवारी ही दुर्घटना घडली असून वरळीयेथील ललित अंबिका या बिल्डींगमध्ये ही लिफ्ट होती. दुर्घटनेत सहा ते सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आज वरळीत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
वरळी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत द्या- आरपीआय मदत न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
झालेली घटना दुर्दैवी असून यातील पीडित कुटुंबाला दहा लाख रुपयांची सरकारी मदत देण्यात यावी, अशा स्वरूपाची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली. सरकारने जर मदत केली नाही तर आरपीआयच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. ही बिल्डिंग निर्माणाधीन होती. इमारतीची लिफ्ट कोसळल्यामुळे कंपनीचे सुपरवायझर आणि कंत्राटदार या दोघांना एनएम जोशी मार्ग पोलीसांनी अटक केली आहे. शनिवारच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी धाव घेत घटनेची पाहणी केली आणि दोषींवर कारवाईच्या सूचना देखील दिल्या होत्या.
हेही वाचा -तळीयेतील पूरग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं- नारायण राणेंची मोठी घोषणा