मुंबई- कोरोनाचा अनेक घटकांना फटका बसला आहे. आजही काही घटक धोरणाच्या वेढ्यात अडकुन आहे. त्यापैकी एक घटक म्हणजे घरकाम करणार्या महिला होय. शहरांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धुणी-भांडी, साफसफाई, स्वयंपाक असे घरकाम करून लाखो महिला आपला संसार चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांच्यावतीने केली जात आहे.
घर कसे चालवावे हा मोठा प्रश्न
लॉकडाऊनच्या काळात काम बंद झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न घरकामगार महिलांच्या समोर उभा राहीला आहे. त्यात नवर्यालाही काम नाही. अनेकांच्या नवर्यांना दारूचे व्यसन असल्याने त्रास आणखीनच वाढला. ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे, त्यांच्यावर मुलाबाळांची किंवा आई-वडील, सासू-सासरे यांची जबाबदारी होती. यातील 90 टक्के घरकामगार महिलांना स्वतःचे घर नाही, त्यामुळे घरभाडे थकले आहे. काही दिवस आधार दिल्यानंतर किराणा दुकानदारांनी किराणा देणे बंद केले आहे. रेशन कार्ड नसल्याने सरकारी धान्य मिळाले नाही. अशा चौफेर संकटांनी घर कामगार महिला या सध्या घेरलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने घरकामगार महिलांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. लॉकडाऊन लागून जवळपास वीस दिवस झालेले आहेत. तरीदेखील शासनाची आर्थिक मदत या महिलांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे, घर कसे चालवावे? हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
बेकारीची कुऱ्हाड