मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. मुंबईत रोज दहा हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने मुंबई महानगरपालिकेची डोकेदुखी वाढताना दिसतेय. अनेक कोविड सेंटरवर रुग्णांचा ताण वाढलाय. तो ताण कमी करण्यासाठी ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे दिसत नसतील, मात्र त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे अशा रुग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. मात्र यामध्ये देखील एकाच इमारतीमध्ये पाचहून अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करून मायक्रो कंटेनमेंट झोन महानगरपालिकेकडून घोषित करण्यात येत आहे.
मनपाकडून मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आलेल्या इमारतीत दक्षता घेतात का? - मायक्रो कंटेन्मेंट झोन
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. मुंबईत रोज दहा हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने मुंबई महानगरपालिकेची डोकेदुखी वाढताना दिसतेय. अनेक कोविड सेंटरवर रुग्णांचा ताण वाढलाय.
संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये 12 हजाराहून अधिक मायक्रो कंटेनमेंट झोन महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये 11 हजार मजले कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच काही इमारतींमध्ये एक हजार मजले मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर 90 चाळी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
एका इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येते. त्याहून कमी रुग्णसंख्या एखादा मजल्यावर असेल तर तो पूर्ण मजला सील करण्यात येतो. मात्र तो मजला किंवा ती इमारत सील केल्यानंतर त्या इमारतीच्या सोसायटी मार्फत रोजच्या लागणाऱ्या वस्तू त्या कुटुंबाला पुरवल्या जातात. यासोबतच त्या कुटुंबाकडून रोजचा फेकला जाणारा कचरा हा महानगरपालिकेच्या विशेष गाडीतूनच उचलला जातो. कुटुंबाकडून तो कचरा फेकला जात असताना त्याला व्यवस्थित बांधून घराबाहेर ठेवला जातो. त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी पीपीई किट घालून तो कचरा विशेष असलेल्या कचरा गाडीतून नेला जातो.
मुलुंड परिसरात देखील अशा अनेक इमारती मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. मुलुंड पश्चिम येथे असलेली विकास पॅरेडाइज् सोसायटी देखील मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. या इमारतीत नेमक्या कोणत्या दक्षता घेतल्या जातात? त्या कुटुंबाला लागलेल्या रोजच्या वस्तू कशा प्रकारे पोहोचवल्या जातात याची माहिती ईटीव्ही भारतकडून घेण्यात आली.