महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'भाजपची सर्कस सगळा देश पाहतोय'.. भाजप नेत्याच्या विधानावर काँग्रेसकडून पलटवार - भाजप

'कोरोना संक्रमण काळात देखील प्रचार र‌ॅलीत गुंग असलेल्या भारतीय जनता पक्षाची सर्कस सगळा देश पाहतोय' असा टोला काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते आणि माजी आमदार चरणसिंह सप्रा यांनी लगावला आहे.

bjp-congress
भाजप-काँग्रेस

By

Published : Jun 9, 2020, 6:52 PM IST

मुंबई - 'देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी करत असलेल्या रॅलींना सर्कस बोलावे की, महाराष्ट्राचे सरकार जे कोरोनाविरुद्ध लढत आहे, त्याला सर्कस बोलावे' असा पलटवार काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावर केला आहे.

'शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या हाती लगाम असूनही महाराष्ट्रातील सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकारची सर्कस सुरू आहे,' अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल (सोमवार) महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल र‌ॅली दरम्यान केली होती. या टीकेला आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते आणि माजी आमदार चरणसिंह सप्रा यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...'महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे की सर्कस सुरू आहे?'

जगामधील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या वर गेला. तेव्हा तेथील राजकीय पक्ष चिंता व्यक्त करत आहेत. मात्र, आपल्या देशात अडीच लाखापेक्षा जास्त रुग्ण असताना सत्ताधारी भाजप निवडणूक रॅली करत आहे. 'कोरोना संक्रमण काळात देखील प्रचार र‌ॅलीत गुंग असलेल्या भारतीय जनता पक्षाची सर्कस सगळा देश पाहतोय' असा टोला यावेळी काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते आणि माजी आमदार चरणसिंह सप्रा यांनी लगावला आहे. केंद्र सरकारच्या असंवेदनशीलपणाची सर्कस देश बघत आहे. या सर्कसमध्ये विदुषकांची संख्या जरा जास्तच आहे, असेही सप्रा म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला आज संकटातही राजकारण सुचत आहे. जर कोरोना आटोक्यात आला असता, तर श्रेय नरेंद्र मोदींना गेले असते. संख्या वाढत आहे तर त्याची जबाबदारी मात्र राज्य सरकारवर टाकण्याचे षडयंत्र सुरू आहे, याकडे सप्रा यांनी लक्ष वेधले. यापेक्षी लडाखच्या सीमेवर जे सुरू आहे, त्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगावे, अशी मागणीही सप्रा यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details