मुंबई - मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) विरूद्ध अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ह्या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येत आहेत. आता या प्रकरणांमध्ये कागदपत्र सादर करून एकमेकांविरुद्ध दावे-प्रतिदावे हे केले जात आहेत. मलिकानी समीर वानखेडे ह्यांच्या संदर्भात काही कागदपत्र समोर आणली आहेत. या कागदपत्रांमध्ये समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला हा सादर करण्यात आला. ज्यात नोंदीनुसार समीरचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असून त्याचा धर्म मुस्लिम असल्याचे दिसत आहे.
समीर वानखेडे यांनी कागदपत्रे सादर करत नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्याचा विरोध करत समीर वानखेडे यांनी कागदपत्र सादर केली आहे. वानखेडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रात समीर वानखेडे यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे आहे असे दिसून येत आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी जात प्रमाणपत्र सादर केले. नवाब मलिक यांनी केलेल्या दाव्याचा विरोध करत समीर वानखेडे यांनी कागदपत्र ही सादर केली आहे. ज्यात समीर वानखेडे यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे आहे असे दिसून येत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले नवाब मलिक?
समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जातीचा तसेच जन्माचा दाखला दाखवला जात आहे. तो खोटा असून, 1993 नंतर आपला धर्म लपवण्यासाठी वानखेडे कुटुंबीयांकडून खरे दस्तावेज लपवले जात आहे. समीर वानखेडे यांची पहिली पत्नी मुस्लिम असून, त्यांनी समोर येऊन कोणतेही सत्य सांगू नये, यासाठी समीर वानखेडे यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे. तसेच ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात पहिल्या पत्नीच्या चुलत भावाला समीर वानखेडे यांनी अडकवले असल्याचा खळबळजनक दावा हे नवाब मलिक यांनी केला आहे.