महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 10 किलो 600 ग्रॅमचा गोळा - मुंबई

घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात सुग्रीव निर्मल (वय 51 वर्षे) यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी 10 किलो 600 ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला. आता रुग्ण ठणठणीत बरा झाला असून पुढील काही दिवसात ते कामही करू शकणार आहे. सुग्रीव निर्मल यांना काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र, त्यांनी हे दुखणे अंगावर काढले. परिणामी त्यांच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाला. यामुळे त्यांचे पोट सामान्य आकरापेक्षा मोठे झाले. या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे पुढील आयुष्य पुन्हा वेदनेशिवाय जगू शकणार आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Nov 20, 2021, 8:10 PM IST

मुंबई -घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात सुग्रीव निर्मल (वय 51 वर्षे) यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी 10 किलो 600 ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला. आता रुग्ण ठणठणीत बरा झाला असून पुढील काही दिवसात ते कामही करू शकणार आहे. सुग्रीव निर्मल यांना काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र, त्यांनी हे दुखणे अंगावर काढले. परिणामी त्यांच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाला. यामुळे त्यांचे पोट सामान्य आकरापेक्षा मोठे झाले. या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे पुढील आयुष्य पुन्हा वेदनेशिवाय जगू शकणार आहेत.

माहिती देताना वैद्यकीय अधिकारी

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या पोटातून तब्बल 10 किलो 600 ग्रॅम वजन असलेला मासाचा गोळा बाहेर काढला आहे. चेंबूर परिसरात कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय असलेल्या निर्मल यांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात त्याला पोटदुखीचा त्रास होता. त्यामुळे महिनाभरापूर्वी त्याच्या नातेवाईकांनी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. अजय गुजर आणि सुंदरम पिल्ले यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत पोटातून 10 किलो 600 ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा डॉक्टरांनी बाहेर काढला.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली आहे. हीच यामुळे शस्त्रक्रिया दुसरीकडे केले असते तर तब्बल 25 लाख रुपये खर्च आला असता. पालिका रुग्णालयाला नाव ठेवणाऱ्यासाठी अशाच शस्त्रक्रिया या चपराक ठरणार आहे. ज्या रुग्णांना अशाप्रकारे शरिरात कुठेही गाठ आढळली असेल, तर त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहनही डॉ. अजय गुजर यांनी केले आहे.

हे ही वाचा -Antilia bomb scare case : क्रिकेट बुकी नरेश गौर यांना एनआयए कोर्टाकडून जामीन

ABOUT THE AUTHOR

...view details