महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्णांना राख्या बांधून डॉक्टर-परिचारिकांनी साजरी केली अनोखी राखी पौर्णिमा - rakshabandhan latest news

मुलुंडच्या जम्बो कोविड रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना, तर कोविड बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून आजचा राखी पौर्णिमेचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.

Doctors and nurses celebrated Rakhi Pournima with patients in mumbai
कोरोना रुग्णांना राख्या बांधून साजरी केली आनोखी राखी पौर्णिमा

By

Published : Aug 22, 2021, 8:24 PM IST

मुंबई -बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुलुंड परिसरात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना कोविड बाधेमुळे आजच्या (रविवार) राखी पौर्णिमेला आपल्या आप्तांना भेटणे शक्य नव्हते. ही उणीव भरुन‌ काढण्याचा प्रयत्न म्हणून आज रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण आवश्यक ती काळजी घेत साजरा करण्यात आला.

ओवाळणी म्हणून देण्यात आले 'मास्क' -

मुलुंडच्या जम्बो कोविड रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना, तर कोविड बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून आजचा राखी पौर्णिमेचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून भावांनी आपल्या बहिणींना 'मास्क'ची भेट देत घरातील सर्वांना योग्य प्रकारे मास्कचा वापर करण्याचे व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे 'प्राॅमिस' घेतले आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप आंग्रे यांनी दिली आहे.

डॉक्टरांना महिला रुग्णांनी बांधली राखी -

या रुग्णालयात सध्या ३०८ खाटा कार्यरत असून यापैकी ५८ खाटा या 'अतिदक्षता खाटा' (ICU Bed) आहेत. याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण बांधवांना आज (रविवार) राखी बांधून येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी राखी पौर्णिमा साजरी केली. तर रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णांनी देखील रुग्णालयातील आपल्या डॉक्टर भावांना राखी बांधून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आजचा राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला आहे.

१३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार -

'कोविड' बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी आपल्या महानगरपालिकेने उपचार केंद्रे व रुग्णालये सुरू केली आहेत. यापैकीच एक जम्बो उपचार रुग्णालय हे मुलुंड परिसरातील 'रिचर्डसन आणि कृडास' या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेच्या जागेवर १५ जुलै २०२० पासून कार्यरत आहे. आजवर या रुग्णालयाद्वारे तब्बल १३ हजारांपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत.

हेही वाचा -बहिणींकडून 'इव्हल आई' आणि 'रुद्राक्ष' राखींना अधिक पसंती का? जाणून घ्या..

ABOUT THE AUTHOR

...view details