मुंबई - दोन दिवसांपासून राज्यातील रुग्णांचा आकडा नवीन उच्चांक गाठत आहे. गुरुवारी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 14 हजार 492 रूग्ण आढळले होते. तर काल, शुक्रवारी 14 हजार 161 रूग्ण आढळले आहेत.
...म्हणून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढता, डॉ. प्रदीप आवटेंंनी दिली 'ही' कारणे - अपडेट कोरोना न्यूज इन मुंबई
कोरोनाचा वाढता आकडा राज्याची चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले जात असताना राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मात्र 'ईटीव्ही भारत' शी बोलताना टेस्ट वाढल्याने संख्या वाढल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपर्यंत राज्यात दिवसाला 12 ते 14 हजार कॊरोना टेस्ट होत होत्या. तिथे हा आकडा आपण 60 ते 70 टक्क्यांवर नेल्याचे ते म्हणाले.
वाढता आकडा राज्याची चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले जात असताना राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मात्र 'ईटीव्ही भारत' शी बोलताना टेस्ट वाढल्याने संख्या वाढल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपर्यंत राज्यात दिवसाला 12 ते 14 हजार कॊरोना टेस्ट होत होत्या. तिथे हा आकडा आपण 60 ते 70 टक्क्यांवर नेला आहे. त्यामुळे राज्याचा पॉझिटिव्हिटी दर पाहता रूग्ण संख्या 14 हजाराचा आकडा पार करत आहे. पण त्याचवेळी रूग्ण वाढीचा दर 2 टक्क्यांवर असून आता मृत्यूदरही कमी होत आहे, तर गंभीर रूग्णही कमी होत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पण आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले आहे.
ऑगस्टमध्ये 9 ते 13 हजाराच्या घरात रूग्ण आढळत होते. पण 20 ऑगस्टला रुग्णांची संख्या उच्चांकी गेली आहे. आजवरचे सर्वात जास्त 14 हजार 492 रूग्ण 20 ऑगस्टला आढळले आहेत. तर 21 ऑगस्टलाही आकडा 14 हजाराच्या पूढे गेला आहे. 21 ऑगस्टला 14 हजार 167 रूग्ण आढळले आहेत. याविषयी डॉ आवटे यांना विचारले असता त्यांनी टेस्ट वाढल्याने रुग्णांचा आकडाही वाढता दिसत असल्याचे स्पष्ट केले आहे. मे-जूनमध्ये दिवसाला राज्यात 12 ते 14 हजार टेस्ट होत होत्या. पण आता टेस्ट वाढल्या असून दिवसाला 60 ते 70 हजार टेस्ट होत आहेत. तर राज्याचा पोझीटीव्हीटी दर 18 ते 20 टक्के आहे. म्हणजेच टेस्ट केलेल्या एकूण नागरिकांपैकी 18 ते 20 टक्के नागरिक पॉझीटिव्ह येतात. ही बाब लक्षात घेता आता दिवसाला 12 ते 14 हजार वा त्याच्या पुढे रुग्णसंख्या जात असल्याचे डॉ आवटे सांगतात.
रुग्णसंख्या वाढत असली तरी दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या रूग्ण बरे होण्याचा दर 71.62 टक्के आहे. त्यानुसार 657470 रुग्णांपैकी 470873 रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. त्याचवेळी मृत्युदर ही आता हळूहळू कमी होत असल्याचेही डॉ आवटे यांनी सांगितले आहे. मार्चमध्ये राज्यातील मृत्यूदर 27 टक्के होता. त्यावेळी आजार नवीन असल्याने काय आणि कसे उपचार करायचे हाच मोठा प्रश्न होता. पण आता नवनवीन उपचार पध्दती आल्या असून औषधे-इंजेक्शन पण आली आहेत. त्यामुळे मृत्युदर आता आपण 3.3 टक्क्यांवर आणला आहे. तो आता आणखी खाली आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत.
रूग्ण वाढत असले तरी राज्याच्या रूग्ण दरवाढीचा वेग पहिला तर तो 2 टक्के असून हा दर समाधानकारक आहे. पण कोरोनावर नियंत्रण आणत कॊरोनामुक्त राज्य करण्यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातही आता गणेशोत्सव सुरू झाला असून लोकांचा संपर्क एकमेकांशी वाढण्याची शक्यता आहे. त्यातून येत्या काळात रूग्ण संख्या वाढण्याची ही भीती आहे. पण हा सण नागरिकांनी, गणेशभक्तांनी योग्य ती काळजी घेत सुरक्षित आणि कॊरोनाला दूर ठेवत साजरा करावा असे आवाहनही डॉ आवटे यांनी यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत' च्या माध्यमातून राज्याच्या नागरिकांना केले आहे.