मुंबई - डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही संशयित डॉक्टर महिलांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. याप्रकरणी भक्ती मेहेरच्या आईने आज माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. माझी मुलगी जातीवरुन रॅगिंग करूच शकत नाही. त्यामुळे पायलच्या कुटूंबीयांनी केलेले आरोप निराधार असल्याचे भक्ती मेहरच्या आईने म्हटले आहे.
पायल तडवी आत्महत्या प्रकरण; भक्ती मेहेरची आई म्हणते मुलगी निर्दोष, आरोप निराधार
न्यायालयाने पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मात्र डॉक्टर भक्ती मेहेरच्या आईने मुलीवरील आरोप फेटाळले आहेत.
payal
न्यायालयाने त्यांना आज न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मात्र डॉ. भक्ती मेहेर यांच्या आईने पायलवर जातीवाचक शिवीगाळ करुन रॅगिंग केल्याचा आरोप फेटाळला आहे. आमची मुलगीही यातून गेली आहे. मात्र तिने असे कधीही केले नाही. काम जास्त असल्याने त्यांना वेळच कुठे मिळतो, असा सवालही भक्तीच्या आईने केला आहे. हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी त्यांनी केला.