महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संजय राठोड यांच्याबाबत चुकीचे अर्थ लावू नका - नवाब मलिक

नमंत्री संजय राठोड यांच्याबाबत चुकीचे अर्थ लावू नका, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

Breaking News

By

Published : Feb 18, 2021, 12:43 AM IST

मुंबई- देशात मीडियाकडून लोकांना बदनाम करण्याचा धंदा सुरु आहे. सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. न्यायालयाच्या या मताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समर्थन केले आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत चुकीचे अर्थ लावू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

पूजा आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप लावण्यात येत आहे. संजय राठोड मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. याप्रकरणी नवाब मलिक यांना विचारणा केली असता, राठोड सर्वांच्या संपर्कात आहेत. ते कुठेही गायब झालेले नाहीत. सध्या पूजा आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीचा अहवाल आल्यावर अपेक्षित कारवाई केली आहे. मात्र, जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.

राठोड यांनी खुलासा करु नये -

भाजपकडून पूजाच्या आत्महत्येला राज्यमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जात आहे. यासंदर्भात राठोड यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. नवाब मलिक यांनी याबाबत राठोड यांना खूलासा न करण्याचा सल्ला दिला आहे. खुलासा करण्यात नवीन प्रश्न निर्माण होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

चौकशीतून सत्य बाहेर येईल -

पूजाच्या स्टेटसवरुन राज्यमंत्र्यांवर चौफेर टीका सुरु आहे. मात्र, पूजाचा स्टेट्स मी पाहिला असून त्यावर तिचे आई-वडील आणि राज्यमंत्र्यांचा फोटो आहे. तिच्या कुटुंबियांसोबत राठोड यांचे संबंध कसे असतील ते यावरुन दिसते. त्यामुळे स्टेटसवरुन चुकीचा अर्थ काढू नका, असे मलिक यांनी म्हटले.

भाजप सरकारने बोजा वाढवला -

राज्यात विजेच्या थकीत बिलावरून वादंग सुरु आहे. परंतु, २० हजार कोटींची थकबाकी ७० हजार कोटींवर नेऊन सरकारवर बोजा वाढवला आहे. सत्तेच्या काळात कर्जमाफीची दिलेली घोषणाही हवेत विरली. असे असताना महाविकास आघाडीवर भाजपकडून आरोप सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. या सरकारने कोविड तसेच आस्मानी संकटे व्यवस्थित हाताळली आहे. कोविडचे संकट असतानाही कर्जमाफीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सरकारचे काम योग्य प्रकारे सुरु असून केवळ बदनामीसाठी भाजपकडून खोटे आरोप केले जात असल्याचे मलिक म्हणाले.

पुनर्वसनासाठी बावणकुळे यांची खटपट -

भाजपला कधी नव्हे, ती मिळालेली सत्ता हातची गेली. अनेक चेहऱ्यांना भाजपने खड्यासारखे बाजूला केले. चंद्रशेखर बावणकुळे यांचादेखील त्यात समावेश होता. आता सरकार सत्तेवर येईल, अशी आशा भाजपला आहे. त्यामुळे आमदारकी मिळावी, आपले पुनर्वसन व्हावे, याकरिता बावणकुळे प्रयत्न करत आहे. त्यांना जास्त मनावर घेण्याची गरज नाही, असा टोला नवाब मलीक यांनी मारला.

हेही वाचा - क्वारंटाईनमधून पळालेल्या ४ प्रवाशांसह हॉटेल मालकावर गुन्हा नोंद करण्याचे महापौरांचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details