मुंबई -माजी एनसीबी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवार रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव ( Sameer Wankhede's father in Bombay HC ) घेतली असून न्यायालयाच्या आश्वासनानंतरही मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखडे यांनी पुन्हा एकदा नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा ( Dhyandev Wankhede files contempt plea against Nawab Malik ) दाखल केला आहे. या वेळी याचिकेत मलिक यांनी 28 डिसेंबर 2021, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी 2022 रोजी केलेल्या तीन वक्तव्यांचा उल्लेख आहे.
'आदेशानंतरही मलिक आपल्या कुटुंबीची बदनामी करत आहेत'
नवाब मलिक आर्यन खानच्या अटकेनंतर रोज पत्रकार परिषदांना संबोधित करत होते आणि ऑक्टोबर महिन्यापासून समीर वानखेडे त्याचे वडील ज्ञानदेव आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट करत होते. ज्ञानदेव यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी निरीक्षण नोंदवले होते की मलिक हे द्वेषाने ट्वीट करत आहेत. कारण त्यांच्या जावयाला वानखेडे यांनी अटक केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही मलिक आपल्या कुटुंबीची बदनामी करत आहेत. याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा न्यायालयात दाव घेतली आहे.