महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा; प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरिता ज्ञानदेव वानखेडेंनी मागितला दोन आठवड्यांचा वेळ - नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आमच्या कुटुंबांची रोज बदनामी होत असल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या ( Dnyandev Wankhede vs Nawab Malik ) याचिकेत म्हटले आहे. कुटुंबाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियामधून धमक्या मिळत आहेत, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत म्हटले ( Dnyandev Wankhede Extra affidavit in high court ) आहे.

ज्ञानदेव वानखेडे नवाब मलिक
ज्ञानदेव वानखेडे नवाब मलिक

By

Published : Jan 4, 2022, 4:34 PM IST

मुंबई- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिकांविरोधात सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला ( Wankhedes defamation case against Nawab Malik ) आहे. या याचिकेवर आज मंगळवार मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ज्ञानदेव वानखडे यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ( Dnyandev Wankhede Extra affidavit in high court ) दोन आठवड्याचा वेळ मागितला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आमच्या कुटुंबांची रोज बदनामी होत असल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या ( Dnyandev Wankhede vs Nawab Malik ) याचिकेत म्हटले आहे. कुटुंबाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियामधून धमक्या मिळत आहेत, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायालयाने नामदेव वानखडे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

हेही वाचा-Steps for Financial Health : आर्थिक आरोग्य नियंत्रणात ठेवण्याकरिता 'हे' सहा निर्णय घ्या

नवाब मलिक यांचे प्रतिज्ञापत्र
समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही विधान करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात देऊनही नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात विधाने केल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्यामुळे मलिक यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचे नमूद केले. ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवर उत्तरादाखल मलिक यांनी 95 पानांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.

हेही वाचा-Padalkar Vs Awhad: आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार...गोपीचंद पडळकर



न्यायालयाची दिशाभूल करून आणि अनुकूल आदेश मिळवून आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासाठी आणि विशेषत: वानखेडे यांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी उघड करण्यापासून रोखण्याच्या हेतूने वानखेडेंनी खटला दाखल केल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. वानखेडे पिता-पुत्रांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी दडपण्यासाठी चुकीच्या हेतूने हा खटला दाखल केल्याचेही मलिक यांनी ( Nawab Malik Allegations on Wankhede father son ) म्हटले आहे.

हेही वाचा-Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर


मलिक यांनी सोशल मिडियावर केलेली विधाने वानखेडे कुटुंबाची बदनामी करणारी किंवा अपमानास्पद नव्हती. परंतु ते केवळ वानखेडे यांच्या बेकायदेशीर वर्तनाशी संबंधित होते. ते पाहता आपल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणतेही निर्बंध लादता येऊ शकत नाहीत, असे मलिक यांनी पुढे स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details