Contempt Petition On Nawab Malik : नवाब मलिकांविरोधात ज्ञानदेव वानखडे यांची अवमान याचिका
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी (Contempt of court case) याचिका सोमवारी दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी (Hearing today) होणार आहे.
मुंबई: आर्यन खान प्रकरणानंतर मुंबई नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक नवेनवे आरोप करत असल्यामुळे समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीच्या वेळी मलिक यांनी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वानखडे कुटुंबियांवर कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करणार नाही अशी हमी मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती. तरीही मलिक वानखडे कुटुंबांवर टीका करत आहे. हा एकप्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची याचिका ज्ञानदेव वानखडे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली यावर आज सुनावणी होणार आहे.