मुंबई- आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर दररोज वेगवेगळे आरोप करून घेरणारे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आता कायदेशीर लढाईत अडकल्याचे दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या परिवाराकडून आता नवाब मलिक यांच्यावर ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे. या अगोदर नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीची याचिका समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी दाखल केली होती यावर आज नवाब मलिक यांना आपले मत न्यायालयासमोर मांडायचे आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एसी-एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. याआधी वानखेडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना आज मंगळवारी उत्तर दाखल करायचे आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवारा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलिक यांच्यावर एफआयआर नोंदवावा अशी वानखेडे कुटुंबीयांची मागणी आहे.