मुंबई - दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. दिवाळीत आणि फटाके हे समीकरण काही वर्षांपासून तयार झाले आहे. मात्र, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी अनेक संस्था व्यक्ती पुढाकार घेत आहेत. माहीम येथील सारिका शाहू यांनी चॉकलेट स्वरूपात फटाके तयार केले आहेत या फटाक्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन लहान मुलांना केले जात आहे.
हे फटाके वाजत नाहीत
लहान मुलांसाठी दिवाळीमध्ये फटाके हे मुख्य आकर्षण असते. मात्र, काही वर्षापासून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात येत आहे. काही भागांमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी असते. त्यामुळे लहान मुले नाराज असतात. यावर उपाय म्हणून मुंबईतील माहीम येथील सारिका साहू यांनी पर्यावरणपूरक चॉकलेटचे फटाके अशी संकल्पना अंमलात आणली आहे. हे फटाके लहानमुलांसाठी फटाके व चॉकलेटचे एकत्रित मिश्रण असल्याने लहान मुले आणखी आनंदित होऊ शकतात.
7 फ्लेवर मध्ये फटाके
सारिका या गेल्या 4 वर्षांपासून पर्यावरण पूरक चॉकलेट्स फटाके तयार करण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या एक महिना अगोदर चॉकलेट्स तयार करायला त्या घेतात. त्यांच्या या चॉकलेटला मोठी मागणी असते. जवळपास दिवसाला 20 किलो चॉकलेट त्या तयार करतात. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या चॉकलेटला मागणी असते. बाजारात मिळणारे चॉकलेट, अलमंड, बटरस्कॉटच यासारखे 7 फ्लेवर मध्ये फटाके बनवले जातात. त्यापद्धतीत लहान मुले दिवाळीत फटाके घेतात त्याचपद्धतीने हे चॉकलेट असल्याने अनेकांचा कल या फटाक्यांकडे आहे.
चॉकलेटचे फटाके पर्यावरण पूरक दिवाळी
या चॉकलेट मोठी मागणी असते याबरोबरच फटाक्यांच्या सर्व प्रकारचे चॉकलेट आम्ही तयार करतो. त्यामधील बच्चेकंपनीला चॉकलेट ही आणि फटाकेही असा दोन्ही आनंद आमच्या या प्रॉडक्ट मधून मिळतो. राज्य सरकारकडून वारंवार पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा अस आवाहन केलं जातं याला आमच्या या उपक्रमातून पाठिंबा मिळतो असे सारिका साहू यांनी सांगितले.