मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने नुकत्याच ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यावर सहामाही परीक्षा संपत आली असतानाच १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक सोमवारी शिक्षण उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी जारी केले आहे. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला.
- दिवाळीची सुट्टी जाहीर -
कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग सुरु आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मुंबईतील इयत्ता आठवी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत. मात्र दिवाळी काही दिवसांवर आल्याने अजूनही दिवाळी सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे शिक्षण भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना पत्र लिहून याबाबत लक्षात आणून दिले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक यांनी सोमवारी सकाळीच याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.
- अशा असणार सुट्ट्या -