महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Diwali gold buying and selling: दिवाळीत सोने बाजारात येणार तेजी; 600 कोटींची उलाढाल होण्याचे संकेत - Gold is expensive during Diwali

Diwali gold buying and selling: कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही पहिली दिवाळी असणार आहे. Gold Rate in Diwali यावर्षी केवळ दिवाळीत 600 कोटींची उलाढाल सोने बाजारात होईल, असे संकते दिले जात आहेत. मात्र युक्रेन- रशिया युद्ध आणि डॉलरच्या तुलनेने घसरता रुपयामुळे ऐन दिवाळीच्या काळात सोने महाग Gold is expensive during Diwali होण्याची शक्यता आहे.

Gold Rate in Diwali
Gold Rate in Diwali

By

Published : Oct 12, 2022, 9:32 PM IST

मुंबई: Diwali gold buying and selling: कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही पहिली दिवाळी असणार आहे. Gold Rate in Diwali यावर्षी केवळ दिवाळीत 600 कोटींची उलाढाल सोने बाजारात होईल, असे संकते दिले जात आहेत. मात्र युक्रेन- रशिया युद्ध आणि डॉलरच्या तुलनेने घसरता रुपयामुळे ऐन दिवाळीच्या काळात सोने महाग Gold is expensive during Diwali होण्याची शक्यता आहे.

मागील अडीच वर्ष कोरोना काळ असल्यामुळे कोणते ते सण साजरे करता येत नव्हते. मात्र यावर्षी करुणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व सार्वजनिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर दहीहंडी असेल, दसरा असेल, किंवा गणेशोत्सव असेल हे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले गेले आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण देखील मोठा उत्साहात साजरी होणार आहे. दिवाळी हा देशातला सर्वात मोठा सण आहे. या सणावेच्या निमित्ताने घरात मोठी खरेदी केली जाते खास करून दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व हिंदू धर्मात देण्यात आला आहे. धर्मासहित या सणाच्यावेळी इतर धर्मदेखील सोने खरेदीला मोठी पसंती देत आहेत. तसेच करुणानंतर ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे या दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने व्यापारात उलाढाल केली जाईल, असे मत सोने व्यापाऱ्यांचे आहे.

दिवाळीच्या तोंडावर सोने अजून महाग होणारकोरोनाच्या नंतर ही पहिलीच दिवाळी आहे. या दिवाळीला जवळपाचशे ते सहाशे कोटी रुपयांपर्यंतच्या सोने व्यापारात उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामान्यवेळी हीच उलाढाल २०० कोटी रुपयेपर्यंत असते. तसेच कोरोना येण्याआधी दिवाळीत ४०० कोटीपर्यंत उलाढाल होत होती. मात्र या वर्षी ती उलाढाल सहाशे कोटी एवढी होण्याचा अंदाज आहे. आता सोने प्रति तोळा ५३ हजार येवढे आहे. मात्र दिवाळीत याची किंमत ५४ हजारपर्यंत जाऊ शकते.

पुन्हा युक्रेन रशिया युद्ध झाल्यास सोने बाजाराला फटका युक्रेन आणि रशिया देशात पुन्हा युद्ध होण्याशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी ही 4 महिन्यापूर्वी युक्रेन- रशिया युद्ध झालं. त्याचा फटका सोने व्यापाराला बसला होता. सोन्याचे भाव वाढले होते. आता ही युद्ध झाल्यास त्याचा फटका बसू शकतो. तस झाल्यास डॉलरच्या तुलनेत रुपयाची अधिक घसरण होईल. त्यामुळे जगातील बाजारात रुपयाची किंमत कमी झाल्यास सोन्याचा भाव वाढेल. आता सोन्याचा भाव प्रति तोळा ५३ हजाराच्या जवळ आहे. मात्र युद्ध झाल्यास तोच भाव ५५ हजाराच्या वर देखील जाण्याची शक्यता आहे.

लग्नासाठी सोन्याची खरेदी देखील दिवाळीत दिवाळीनंतर लग्न सराई सुरु होणार आहे. देशभरात लग्न दिवाळीनंतर सुरू होतील. या वर्षी लगणाचे मुहूर्त देखील अधिक प्रमाणात आहेत. केवळ हिंदू धर्मात १५५ मुहूर्त आहेत. तसेच केवळ हिंदू धर्मात नाही, तर सर्व धर्मात लग्न मोठ्या प्रमाणात पार पडणार आहेत. आणि सर्वच धर्मात लग्नसोहळाला सोने खरेदी केले जाते. म्हणून यावर्षी अधिक लग्नसोहळाची सोने खरेदी ही दिवाळीत केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळात लोकांनी ५८ हजार रुपये तोळा किंमतीने सोने खरेदी केली होते. मात्र आतातर त्यापेक्षाही किंमत कमी आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीत देखील मोठी उलाढाल सोने बाजारत होईल, अशी शक्यता इंडीयन बिलियन ज्वेलर असोसिएशनचे आध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details