मुंबई -दिवा स्थानकातील पाचव्या आणि सहाव्या मालिकेचे ( Diva Road Inauguration ) आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, युपीए सरकारच्या चुकांमुळे आणि दिरंगाईमुळे मार्गिका रखडल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. तर रेल्वेमार्गाच्या विकासाचा मुद्दा कळीचा आणि अडचणींचा असतो. मात्र, मुंबईत ज्याची सुरुवात होते, त्याचे जाळ देशभरात पसरते आणि अनुकरण ही केले जाते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी ( CM Uddhav Thackeray ) काढला. चांगल्या कामांत नेहमीच अडथळा आणला जातो, असा टोला अप्रत्यक्षपणे भाजपला लागवत फटकेबाजी केली.
उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार -
केंद्र आणि राज्य शासनाच्या 50:50 टक्के सहभागातून टाकण्यात आलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या नवीन ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गिकांचे लोकार्पण आणि अतिरिक्त उपनगरीय सेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुरदृश्य वाहिनीवरून सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना, पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. वॉटर टॅक्सीचे लोकार्पणसाठी केंद्राचा सहभाग, सहकार्य मिळाल्याचा उल्लेख केला. मुंबईमध्ये ज्याची सुरवात होते. त्याच जाळं देशभर पसरते. त्याचे अनुकरण केले जाते. देशातील पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई अशी सुरु झाली होती. इंग्रजांनी ही रेल्वे सुरु केली. त्यावेळी प्रवाशांनी या सेवेचा वापर करावा, यासाठी इंग्रज एक रुपयांचे बक्षिस देत होते. पुढे त्यांनी बक्षिस बंद करून तिकीट सुरु केल्याची आठवण मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून दिली.