महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ - साखर कारखान विक्री भ्रष्टाचार प्रकरण विधानसभा

साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात सुमारे 25 हजार कोटींचा गैरव्यवहार ( Alleged sugar factories corruption case ) झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 25 जानेवारी 2022 च्या सुमारास सरकारला सांगितले होते. याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेमध्ये भाजप आमदार योगेश सागर यांनी प्रश्न विचारला होता. परंतु, या प्रश्नाला उत्तर देताना हे खरे नसल्याचे उत्तरात सांगितल्याने विरोधकांनी या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

alleged sugar factories corruption case
साखर कारखान विक्री भ्रष्टाचार अजित पवार प्रतिक्रिया

By

Published : Mar 14, 2022, 3:28 PM IST

मुंबई -राज्यातील शेतकऱ्यांनी भांडवल व आपल्या जमिनी देऊन उभे केलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात सुमारे 25 हजार कोटींचा गैरव्यवहार ( Alleged sugar factories corruption case ) झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 25 जानेवारी 2022 च्या सुमारास सरकारला सांगितले होते. याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेमध्ये भाजप आमदार योगेश सागर यांनी प्रश्न विचारला होता. परंतु, या प्रश्नाला उत्तर देताना हे खरे नसल्याचे उत्तरात सांगितल्याने विरोधकांनी या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -Home Minister About Fadnavis Interrogation : 'देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली' - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

..तर हक्कभंग आणला जाईल

प्रश्नोत्तराच्या तासात सहकारी साखर कारखाने खरेदी - विक्रीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार योगेश सागर व आशिष शेलार यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सारवा सारव करणारी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर सरकारला जाब विचारत हक्कभंग लागू करण्याचीही देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) उत्तर देण्यासाठी उभे राहिले.

अनेक वर्षे चौकशी सुरू, पण त्यातून काहीच निष्पन्न नाही

या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना साखर कारखाने विक्रीच्या आरोपांबाबत मोठा खुलासा केला आहे. भाजपच्या या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकारी साखर कारखाने खरेदी - विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याबाबत राज्यात अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. मला सांगायचे कारण नसताना वेगळ्या पद्धतीने गैरसमज निर्माण होतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अशी तक्रार केली होती. अण्णा हजारे यांनी तुमच्याकडे व राज्यपालांकडे तक्रार केली होती. तुम्ही सीआयडी चौकशी लावली. ही चौकशी तुमच्या मुख्यमंत्री काळात झाली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही.

अजित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेला चौकशीचे आदेश दिले. न्यायाधीशांकडून चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातच दोन चौकशा झाल्या, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अनेक साखर कारखाने राज्य सहकारी बँकेला द्यायचे लोक आरोप करतात मग कारखाने चालवायला घ्या. साखर कारखाना खरेदी - विक्री बाबत फडणवीस यांच्यासह देशपातळीवर गैरसमज झालेला आहे. प्रत्येकाला साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे. साताऱ्यात किसनवीर साखर कारखान्यावर 625 कोटींचे कर्ज झाले. आता कारखान्यापेक्षा कर्जच जास्त झाले. समस्या कुणाला माहीत नाही. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात.

दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल

उच्च न्यायालयाने आदेश दिला जे साखर कारखाने पैसे देऊ शकत नाही. ते कारखाने विका. त्यानुसार ही विक्री प्रक्रिया राबविली. अण्णा हजारे यांनी मागे तक्रार केली होती. एकदा त्यांना जाऊन भेटाव आणि कोणाच्या चौकशा झाल्या. सीआयडी, एसीपी, ईओडब्ल्यू, न्यायाधिशांकडून चौकशा झाल्या. त्यात काय झाले हे त्यांना सांगावे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असा टोलाही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

या राज्यात यशवंतराव मुख्यमंत्री आल्यापासून देवेंद्र फडणवीस असे पर्यंत साखर कारखान्यांना सरास हमी देण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार आल्यावर पंढरपूर कारखाना, शंकरराव काळे, धनंजय महाडिक कारखाने, संग्राम थोपटे अशा पाच कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले साखर कारखान्यांना राज्य सरकार हमी देणार नाही. अडीच वर्षे झाली जो तो आपले कारखाने चालवत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा -Dog Carrying Baby Hyderabad : हैदराबादमध्ये चक्क अर्भक तोंडात घेऊन फिरताना दिसला कुत्रा

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details