महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेड रिसेंट सोसायटीचा कौतुकास्पद उपक्रम, गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप - Mumbai Latest News

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याने, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर अलिमुद्दिन हे रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरची सेवा पुरवत आहेत.

गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप
गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप

By

Published : Apr 28, 2021, 11:02 PM IST

मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याने, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर अलिमुद्दिन हे रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरची सेवा पुरवत आहेत. त्यांनी आतापर्यंत एक हजार सिलिंडरचे मोफत वाटप केले असून, यातून जवळपास सात हजार रुग्णांचे प्राण वाचले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

डॉक्टर अलिमुद्दिन हे रेड रिसेंट सोसायटीतर्फे हे ऑक्सिजन सिलिंडर मोफत देण्याचे काम करत आहेत. त्यांनी यासाठी 50 सेंटरची उभारणी केली असून, मुंबईतल्या सुमारे 30 मशिदीतून हे सिलिंडर गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. हे काम जात, धर्म, पंथ यापलिकडचे असून, सध्या मानसाचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याचे अलिमुद्दिल यांनी म्हटले आहे.

गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचे वाटप

'ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत मोठ्याप्रमाणात वाढ'

पुढे बोलताना अलिमुद्दिन म्हणाले की, सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते, मात्र अनेक जणांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावतो. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही ऑक्सिजन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये देखील काही अडचणी येत आहेत. मोठ्या प्रमाणात सिलिंडरची मागणी वाढली आहे. ऑक्सिजन सिलिंडर जर 100 असतील तर हजार जणांकडून मागणी होत आहे. ऑक्सिजन फ्री मिळतो, मात्र सिलिंडर घेतल्यानंतर डिपॉझिट म्हणून पाच हजार रुपये जमा करावे लागतात. सिलिंडर जेव्हा सेंटरमध्ये जमा केल्या जाते, तेव्हा ती रक्कम पुन्हा संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जाते.

हेही वाचा -ठरलं..! राजू शेट्टींचा महाडिक गटाला पाठिंबा; गोकुळ 'मल्टिस्टेट' होणार नसल्याचे आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details