महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून मुंबई विद्यापीठ सिनेट बैठकीच्या सुरुवातीलाच गदारोळ - mumbai university cinet online meeting news

कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर सिनेटची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. मात्र, या दाव्याला बहुतांशी सिनेट सदस्याने विरोध करत ही बैठक विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षांत सभागृहात घेता आली असती असेही सदस्याकडून सांगण्यात आले.

mumbai-university-cinet
मुंबई विद्यापीठ सिनेट बैठक

By

Published : Aug 25, 2020, 4:35 PM IST

मुंबई -मुंबई विद्यापीठाने या वर्षातील दुसऱ्या सिनेट बैठकीचे आज ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले असून ही बैठक दुपारी एक वाजता सुरू झाली. या बैठकीच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नावरून गदारोळ सुरू झाला असल्याचे सांगण्यात येते. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यापीठ प्रशासनाने माध्यम प्रतिनिधीला या बैठकीपासून दूर ठेवले आहे. झूम ॲपवर घेण्यात येत असलेल्या बैठकीत माध्यम प्रतिनिधींना सामावून न घेतल्याने बुक्टोत आणि एमफुक्टो आदी शिक्षक संघटनांनीही या विद्यापीठाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.

कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर सिनेटची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. मात्र, या दाव्याला बहुतांशी सिनेट सदस्याने विरोध करत ही बैठक विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील दीक्षांत सभागृहात घेता आली असती, असेही सदस्याकडून सांगण्यात आले. दुपारी एक वाजता सुरू झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर आणि प्राध्यापकांच्या विविध अडचणींवर सिनेट सध्या सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेरले असल्याची माहिती सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहिचडे यांनी दिली.

या नेट बैठकीत विद्यापीठाचा वर्षभरातील कृती आराखडा त्यासोबतच विविध महाविद्यालयांना पुढील वर्षात देण्यात येणाऱ्या मान्यता आणि विद्यापीठाच्या एकूणच अर्थसंकल्पात संदर्भात महत्वाचे विषय रात्री उशिरापर्यंत संमत केले जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details