मुंबई- पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्वावर लांब पल्ल्याच्या चार रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी डिस्पोजेबल लिनेन (बेडराेल) देण्याची सुरुवात केली होती. प्रवाशांकडून चांगला प्रतिसदा पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वे इतरही मेल-एक्स्प्रेस गाड्यातही डिस्पोजेबल लिनेनची सुविधा उपलब्ध करू देणार आहे.
रेल्वे मंत्रालय पहिल्या टप्यात लांब पल्याच्या ४० गाड्यांमध्ये डिस्पोजेबल लिनेन ( disposable linen in 40 railway ) पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांना हे डिस्पोजेबल लिनेन बेडराेल दरात विकत घेता येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीची ( private company appointed to supply linen ) नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा-Ancient Kolhapur Temple Reconstruction : शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचे का काढले जात आहेत संगमरवर...
खासगी कंपनीची नियुक्ती -
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्लीपर आणि एसी डब्यामध्ये प्रवाशांना बेडरोल आणि ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशांचा सुरक्षेसाठी बेडरोल आणि ब्लँकेटची सुविधा बंद करण्यात आली होती. खबरदारी म्हणून प्रवाशांना रेल्वे प्रवासात आपले बँकेट आपणच सोबत घेऊन यावे, अशा सूचना रेल्वेकडून देण्यात आलेल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या असून देशभरातील रेल्वे गाड्या नियमितपणे धावू लागल्या आहेत. सध्या हिवाळ्याची सुरुवात झाल्याने रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान थंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील स्लीपर आणि एसी डब्यामध्ये प्रवाशांना बेडरोलची सुविधा सुरू करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर लांब पल्ल्याच्या चार रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना डिस्पोजेबल लिनेन (बेडराेल) देण्यास सुरुवात केली.