मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी मागील वर्षी ऐन दिवाळीत संप पुकारला होता. मागण्या पूर्ण न झाल्याने संपाने हिंसक वळण घेतले होते. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला ( ST workers had attacked the house of NCP president Sharad Pawar ) होता. परिणामी या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. मात्र त्या एसटी कर्मचाऱ्यांसह 118 बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एसटी महामंडळात सेवेत रूप करून घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गूनरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू केल्या जाणार ( Dismissal ST workers join the service again attacked Sharad Pawar's house )असल्याची माहिती दिली आहे.
दिवाळात पुकारला होता संप - गेल्या वर्षी एन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तेव्हाच तात्कालीन महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलो होतो. जवळपास साडेसहा ते सात महिने एसटी कर्मचाऱ्यांचा हा संपत चालला होता त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा देखील सहन करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी तात्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या.