मुंबई -आम्हाला यापुढे त्रास देऊ नये, अन्यथा आम्हाला काहीतरी चुकीचे पाऊल उचलावे लागेल. मुलीच्या मृत्यूवरून राजकारण थांबवावे, या छळाची तक्रारही कुटुंबीयांनी महिला आयोगाकडे केली आहे. आज महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या सदस्या दिशाच्या पालकांना भेटण्यासाठी ( Mayor Kishori pednekar meet Disha Salian family ) आल्या होत्या. दखल घेण्याजोगी बाब म्हणजे केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने दिशाची हत्या केल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे.
दिशा सालीयन यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया 'डील रद्द झाल्यामुळे ती नाराज होती'
नारायण राणे ज्या पद्धतीने दिशा सालीयन यांच्यावर आरोप करत आहेत, तसे काहीही झालेले नाही आणि आरोप खोटे आणि निराधार आहेत, आम्ही आमचे म्हणणे पोलिसांना दिले आहे. दिशाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आणि निराधार आहेत, त्यामुळे आपण सर्वजण दुखावलो आहोत, डील रद्द झाल्यामुळे ती नाराज होती असे त्यांच्या घरच्यांनी सांगितले आहे.
महिला आयोगाला दिले पत्र -
महापौरांची भेट घेतल्यानंतर दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना विनंती केली आणि नेत्यांना विनंती केली की, आता माझ्या मुलीची बदनामी करू नका, आम्हाला जगू द्या, नेत्यांनाही याप्रकरणी मौन बाळगण्याची विनंती करण्यात आली आहे. याप्रकरणी माझ्या मुलीची कोणीही बदनामी करू नये, आम्हाला त्रास देऊ नये, असे महिला आयोगाला सांगण्यासाठी मी महिला आयोगाला पत्र लिहून महापौरांना दिले आहे असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
महापौर पेडणेकर यांनी घेतली भेट -
दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजपचे नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी ( Mayor Kishori Pednekar Complaint to Women Commission ) केलीय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महिला आयोगाला पत्र ( Women Commission orders in Disha Salian Case ) पाठवल्या नंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या चारीत्र्यावर संशय निर्माण करून बदनामी करणारे ट्विट केले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या दिशा सालियन हिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या यांची त्यांची भेट ( Mayor Kishori pednekar meet Disha Salian family ) घेतली आहे. सविस्तर वाचा...
हेही वाचा -Disha Salian Murder Case : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट, म्हणाले 'ती काळी मर्सिडीज....'