मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे ( Nitesh Rane pre arrest bail ) यांच्याविरोधात दिशा सालियनच्या ( Disha Salian Case ) आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयाने निकाल देताना काही अटी व शर्तीसह राणे पिता-पुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर केला ( Narayan Rane pre arrest bail granted ) आहे. त्यामुळे, राणे कुटुंबीयांना हा मोठा दिलासा आहे. न्यायमूर्ती एस.यू. बघेले यांनी हा निर्णय दिला.
हेही वाचा -फळांच्या राजासाठी सामान्यांना करावी लागणार एक महिन्याची प्रतीक्षा
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता
नारायण राणे ( Narayan Rane pre arrest bail ) आणि नितेश राणे ( Dindoshi court Nitesh Rane pre arrest bail ) यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने यापूर्वीच अंतरिम दिलासा दिला होता. कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावर रितसर सुनावणी सुरू होती. मंगळवारी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज यावर निकाल देत राणे पिता-पुत्रांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र, त्याआधी नारायण राणे यांच्यावतीने त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी, तर मुंबई मालवणी पोलिसांच्या वतीने डीसीपी विशाल ठाकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
काय आहे प्रकरण?
दिशा सालियानची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबीयांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते. दिशा सालियानवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती, असा नारायण राणेंचा दावा होता.
नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियानप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियानची हत्या झाल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे, आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या शिवविच्छेदन अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून, मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.