मुंबईमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर Vice Chancellor Suhas Pednekar यांचा कार्यकाळाचा 8 सप्टेंबर शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील Higher Education Minister Chandrakant Patil यांच्या हस्ते विद्यापीठातील कंपोस्ट खताचा प्रकल्प तसेच तलावाचे सुशोभीकरण आणि क्यू आर कोड 'मायबाईक' सायकल एपचे उदघाटन कार्यक्रम पार पडला आहे. मात्र चर्चा रंगली ती कुलगुरू पेडणेकर यांनी जाता जाता जुन्या सायकलींचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हातून करवून घेतले याची.
कुलगुरूंनी जाता जाता मात्र पुढील वर्षासाठी मुंबई विद्यापीठाचा बृहद आराखडा सिनेट बैठकीत मंजूर केल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली. ज्याला शिवसेनेच्या प्रदीप सावंत राजन कोळंबेकर यांनी आक्षेप घेतला. मुंबई विद्यापीठाशी संबंधित सुमारे 600 महाविद्यालय तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागातील कुठे कुठे नवीन महाविद्यालय सुरू करणे त्यांचे नियोजन या संदर्भात या मान्यता घेण्यात आली. हा आराखडा राज्यपालांकडे मंजुरीसाठी देण्यात येईल. त्यांची मंजुरी प्राप्त झाली की, मग त्याची अंमलबजावणी होईल. मात्र व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी या बैठकबाबत पत्र लिहून आक्षेप घेतल्याने वाद सुरू झाला आहे.
विद्यार्थ्यांची बाजूया संदर्भात विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मुंबई सचिव अमीर काझी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, मुंबई विद्यापीठात विविध 17 विभाग आहेत. त्या विभागात शिक्षण घेणाऱ्या हजारो मुलांना वसतिगृहाची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामुळे अडथळा निर्माण होतोय. कुलगुरूंनी जाता जाता जुन्या सायकलींचे उद्घाटन उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हातून करणे, याबद्दल तर आम्हाला हसू येत. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी एकच होस्टेल आहे. या समस्येवर उपाययोजना या कुलगुरूंनी करणे अभिप्रेत होते.