महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पालिका इमारत सोडून 'बीएमसी'चा अर्थसंकल्प 'इंडिया बुल्स'मध्ये; नगरसेवकांमध्ये नाराजी - अर्थसंकल्पावर इंडिया बुल्स मध्ये विचारमंथन

पालिकेच्या रस्ते आणि आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात काय असणार आहे, याची माहिती स्थायी समिती सदस्यांना व्हावी म्हणून परळ येथील 'इंडिया बुल्स' या खासगी इमारतीमध्ये सादरीकरण करण्यात आले.

bmc
मुंबई पालिका

By

Published : Dec 13, 2019, 8:58 PM IST

मुंबई- महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून तयार केला जातो. प्रशासनाकडून अर्थसंकल्पाबाबत गुप्तता पाळली जात असताना २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रस्ते आणि आरोग्य विभागासाठी काय असणार? याचे सादरीकरण एका खासगी सल्लागाराकडून करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर हे सादरीकरण पालिकेच्या सभागृहात किंवा कमिटी हॉलमध्ये न करता खासगी ठिकाणी करण्यात आले आहे.

मुंबई पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा

यामुळे मुंबईमधील सर्व पक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली असून पालिका प्रशासनाने एका खासगी सल्लागाराकडे अर्थसंकल्पाची माहिती फोडल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. यापुढे सल्लागारच पालिकेचे कामकाज करणार असतील, तर पालिकेत ५ आयएएस अधिकाऱ्यांची गरज काय? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -'गरज पडल्यास सेना-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत घेऊ'

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३२ हजार कोटींचा आहे. पालिकेला कर रूपाने येणारे उत्पन्न, नागरिकांच्या सोयी सुविधांवर केला जाणारा खर्च, याचा जमाखर्च बजेटमध्ये प्रशासनाकडून मांडला जातो. आतापर्यंत अर्थसंकल्प बनवताना पालिका प्रशासनाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात येत होती. यावर्षी मात्र पालिकेच्या रस्ते आणि आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात काय असणार आहे, याची माहिती स्थायी समिती सदस्यांना व्हावी म्हणून परळ येथील 'इंडिया बुल्स' या खासगी इमारतीमध्ये सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणादरम्यान स्थायी समिती सदस्यांच्या सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी स्थायी समिती सदस्यांना बेस्टच्या एसी बसने पालिका मुख्यालयापासून इंडिया बुल्स या इमारतीत नेण्यात आले. याठिकाणी गेलेल्या काही स्थायी समिती सदस्यांना पालिक प्रशासनाचे कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी काढता पाय घेतला आहे.

हेही वाचा -''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'

पालिका प्रशासनाकडून इंडिया बुल्स सारख्या खासगी इमारतीत सल्लागाराकडून करण्यात आलेल्या सादरीकरणाबाबत मुख्यालयात चर्चा सुरू आहे. पालिका मुख्यालयात चार कमिटी हॉल, एक सभागृह तसेच आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना बैठकी घेता याव्या यासाठी जागा आहे. पालिकेत समितीच्या बैठका होण्याच्या ठिकाणी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करता आले असते. तसेच नगरसेवकांनी सूचनाही केल्या असत्या. मात्र, पालिका मुख्यालय सोडून इंडिया बुल्स सारख्या एका खासगी इमारतीमध्ये सादरीकरण करण्याची गरज काय? गोपनीय असलेला अर्थसंकल्प एका खासगी सल्लागारासाठी का फोडण्यात आला? स्थायी समिती सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्य अर्थसंकल्पात आपल्या सूचना मांडू शकत नाहीत का? इतर नगरसेवकांना का बोलवण्यात आले? असे अनेक प्रश्न नगरसेवकांकडून विचारण्यात येत आहेत.

५ आयएएस अधिकाऱ्यांची गरजच काय -

मुंबई महापालिकेत ५ आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे कामकाज केले जाते. पालिकेच्या अनेक विभागांचे खासगीकरण करण्यात आले आहे. पालिकेच्या अर्थसंल्पाचे सादरीकरण एका खासगी इमारतीमध्ये खासगी सल्लागाराकडून केले आहे. यामुळे आता पालिकेचा सर्व कारभार सल्लागाराच्या मार्फतच चालवावा, आयएएस अधिकाऱ्यांची गरज काय? असे प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details