महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Former Mla Bhai Jagtap : एक टायपिंग मिस्टेक अन् विधानपरिषदेत पुन्हा भाई जगतापांच्या नावाची चर्चा - Bhai Jagtap Name Again Legislative Council

राज्यपाल अभिभाषण आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्यात आला. त्यामध्ये भाई गिरकर यांच्याऐवजी भाई जगताप यांचा नावाचा समावेश झाला ( Bhai Jagtap Name Again Legislative Council ) आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Bhai Jagtap
Bhai Jagtap

By

Published : Mar 7, 2022, 3:57 PM IST

मुंबई - राज्यपाल अभिभाषणात विधान परिषदेचे माजी सदस्य भाई जगताप यांचा उल्लेख करण्यात ( Bhai Jagtap Name Again Legislative Council ) आला. सदस्य पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही भाईंच्या नावाचा उल्लेख आल्याने सभागृहात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अखेर प्रशासनाने भाई जगताप ऐवजी भाई गिरकर, असा खुलासा केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव आज विधानपरिषदेत चर्चेसाठी मांडण्यात आला. अभिभाषणातील चुकीच्या नावाकडे परिषदेचे सदस्य कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जगताप यांचा उल्लेख कसा?, असा प्रश्न विचारला. भाई सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. तरीही अभिभाषण पुस्तिकेत नाव छापून आल्याने सभागृहात एकच हस्या पिकला.

दरम्यान, भाई जगताप यांचा उल्लेख चुकून झाला असून, भाई गिरकर यांनी सुचवलेल्या सुधारणा आहेत. भाई जगताप ऐवजी भाई गिरकर वाचावे, असे सांगत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी वादावर पडदा टाकला.

हेही वाचा -Prasad Lad In High Court : पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळावे; प्रसाद लाड यांची उच्च न्यायालयात धाव

ABOUT THE AUTHOR

...view details