मुंबई:देशातील भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे सनातनी प्रवृत्ती बळावर चालल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप करीत काँग्रेस मधील काही प्रमुख ज्येष्ठ नेते काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Former Chief Minister Prithviraj Chavan यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ काँग्रेसचे बडे नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यामुळे काँग्रेस अधिकच अडचणीत आली.
काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचा खरगेंना फटका दिल्लीत वातावरण तणावाचेज्येष्ठ नेत्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्याच्या वातावरणात काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक Election of Congress President लागल्यामुळे पक्षातील सामान्य नेते आणि कार्यकर्ते यांच्यात काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती पाहायला मिळते आहे. सोनिया आणि राहुल यांनी खरगे यांच्या पारड्यात आपले मत टाकले असले, तरी महाराष्ट्रातील सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी शशी थरूर यांना पसंती दिली. यामुळे दिल्लीत वातावरण तणावाचे झाले आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचा खरगेंना फटका शशी थरूर यांना वाढता पाठिंबाखरगे यांच्यापाठोपाठ प्रचारासाठी थरूर महाराष्ट्रात आले होते. अशावेळी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये त्यांचे स्वागत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. प्रत्यक्षात काही वर्षांपूर्वी मुंबई काँग्रेस आपल्या ताब्यात ठेवणारे मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या समर्थकांनी ठरवून थरूर यांची भेट घेऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा मनमानी कारभार आणि पक्ष वाढीसाठी कोणतीही ठोस भूमिका नसल्यामुळे देवरा आणि कामत समर्थकांनी ठरवून थरूर यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गटअमरजीत मनहास, राजन भोसले, भालचंद्र मुणगेकर, प्रदीप नाईक, शिवजीत सिंह यांनी थरूर यांचे टिळक भवनमध्ये जोरदार स्वागत केले. त्यामुळे काँग्रेसमधील या दुसऱ्या गटाने पटोले, चव्हाण, थोरात यांना आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे हे हमखास विजयी होतील. पण या समर्थकांची ४० ते ५० मते फुटली तरी हा एकप्रकारे गांधी कुटुंबियांचा अपमान असेल, आणि पक्षाला भविष्यातही त्याचा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे.