महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Selfie With Aryan Khan : आर्यन खान सोबत किरण गोसावीने सेल्फी का काढला? आरोपपत्रातून झाला खुलासा - Aryan Khan Drugs case

आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ( NCB ) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली असली तरी आर्यनला अटक केली. त्यावेळी एनसीबीने पंच किरण गोसावी यांनी काढलेल्या सेल्फी का काढला होता. ( why Kiran Gosavi taken selfie with Aryan Khan )

Kiran Gosavi taken selfie with Aryan Khan
आर्यन खान सोबत किरण गोसावीने सेल्फी का काढला

By

Published : Jun 2, 2022, 6:05 PM IST

मुंबई -आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात ( Aryan Khan Drugs case ) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ( Narcotics Control Bureau ) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली असली तरी आर्यनला अटक केली. त्यावेळी एनसीबीने पंच किरण गोसावी यांनी काढलेल्या सेल्फी का काढला होता. ( why Kiran Gosavi taken selfie with Aryan Khan ) संदर्भात एनसीबी खुलासा केला आहे की, मित्रांना दाखवण्यासाठी आर्यन खान याच्यासोबत सेल्फी काढला होता. माझ्या मित्राला आर्यन खान याचा आवाज ऐकायचा होता. त्यामुळे त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले. अशी माहिती किरण गोसावी याने या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीसमोर नोंदवलेल्या जबाबामध्ये दिली आहे.

सेल्फीमुळे समीर वानखेडेही वादात - पंच किरण गोसावीने आर्यन खान सोबत काढलेल्या सेल्फीमुळे एनसीबाची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली होती. या प्रकरणात एक मुख्य एनसीबीने पंच किरण गोसावी यांनी सेल्फी काढल्यामुळे या प्रकरणात तपास करणारे माजी अधिकारी समीर वानखेडे हे देखील आरोपांच्या भोवऱ्यात सापडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप आर्यन खान प्रकरणात लावले होते.

सेल्फी व व्हिडिओ झाला होता व्हायरल - आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडले नव्हते, मात्र त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख होता असेही त्याने सांगितल्याचे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर एनसीबीने धाड टाकली आणि ड्रग्ज पार्टी उद्ध्वस्त केली होती. या पार्टीमध्ये आर्यन खान देखील उपस्थित होता. आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर किरण गोसावी याने त्याच्यासोबत काढलेला सेल्फी आणि एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मित्राना दाखवण्यासाठी काढला सेल्फी - याबाबत एसआयटीने गेल्या महिन्यात पुण्यातील येरवाडा तुरुंगामध्ये जाऊन किरण गोसावी याचा जबाब नोंदवला होता. आर्यन खान याच्यासोबत काढण्यात आलेल्या सेल्फीप्रकरणी त्याला 36 प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दिलेल्या जबाबामध्ये किरण गोसावी याने फक्त मित्रांना दाखवण्यासाठी हे फोटो काढल्याचे स्पष्ट केले. तसेच या फोटोंमुळे मला आधिच सुळावर चढवण्यात आले असून याबाबत अधिक बोलण्यास आपण उत्सुक नसल्याचेही त्याने सांगितले.

अधिकाऱ्यावर कारवाई करावी - आर्यन खान प्रकरणात साक्षीदार गोस्वामी यांनी काढलेल्या सेल्फीच्या वरून तपास अधिकारी यांना जबाबदार धरले पाहिजे. एखादा साक्षीदार कोठडीमध्ये असलेल्या आरोपी सोबत सेल्फी काढत असेल तर या सर्व प्रकाराची जबाबदारी ही तपास अधिकार्‍यांची असते. त्यामुळे या प्रकरणाचे तपास अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यायला पाहिजेत. असे माजी निवृत्त पोलिस अधिकारी पी.के. जैन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Puntamba Farmers Agitation : पुणतांबा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस; शेतकऱ्यांनी फुकट वाटले कांदे द्राक्षे....

ABOUT THE AUTHOR

...view details