महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

100 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचिट ? सीबीआयकडून मोठा खुलासा - सीबीआय

सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता सीबीआयकडून मोठी माहिती समोर आली आहे.

Disclosure from CBI
Disclosure from CBI

By

Published : Aug 29, 2021, 5:36 PM IST

मुंबई - रविवारचा दिवस उजाडला आणि राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली ती म्हणजे अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये खंडणी वसुलीचे आरोप आहेत. याचा तपास सीबीआयसुद्धा करत आहे. समाज माध्यमांवर एक सीबीआय डॉक्युमेंट्स व्हायरल झाले आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिले असल्याचे सांगितले होते. मात्र सीबीआयकडून एक माहिती प्रसारित करण्यात आली आहे, यामध्ये सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची क्लीनचिट दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

क्लीन चीट दिल्याच्या अहवालावर सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

सीबीआयने काय म्हटले आहे -

सीबीआयकडून प्रसारित माहितीमध्ये असे म्हटले आहे की, आम्हाला अनिल देशमुख यांच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत. एका याचिकेच्या आधारावर मुंबई हायकोर्टाने आम्हाला अनिल देशमुख यांच्या संदर्भातल्या 100 कोटी रुपये वसुली प्रकरणाचा प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासामध्ये काही पुरावे आढळले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही केस फाईल केली आहे. 24 एप्रिलला एफआयआर दाखल करून घेतला आहे. या एफआयआरची एक कॉपी सीबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या प्रकरणाचा अजन तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details