Mumbai Police : पोलिसांनी खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई - पोलीसांचे चिन्ह
दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी 'पोलिस' असे लिहितात, पोलिसांचा लोगो असलेले स्टीकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसाच्या नावाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. याबाबद तक्रारी वाहतूक विभागाला (Traffic Police Department) प्राप्त झाल्या आहेत.
मुंबई - पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या खासगी वाहनांवर पोलिस अशी पाटी लावणे, पोलिस लिहिणे, तसेच पोलिसांचा लोगो लावू नयेत, असे आदेश वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांनी दिले आहेत. तसेच पुढील चार दिवसांत खाजगी वाहनांवरील 'पोलीस' नावाची पाटी काढण्याचे आदेश सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काय आहे आदेश
दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी 'पोलिस' असे लिहितात. पोलिसांचा लोगो असलेले स्टीकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसाच्या नावाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. याबाबद तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारे 'पोलीस' पाटी लावून खाजगी वाहन चालवित असल्याबाबत उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा या तत्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलीसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे 'पोलीस' पाटी लावलेली वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न होता सोडतात. पोलीस पाटीचा गैरउपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो वाहतूक पोलीस सहआयुक्त यांच्या आदेशात म्हटले आहे.
अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
सर्व प्रभारी पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच यापुढे अशाप्रकारची पोलीस पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होणार आहेत.
हेही वाचा -Maharashtra Assembly Speaker Election : याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार- नाना पटोले